अनेक दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगामी Realme 12 Pro सिरीजची चर्चा सुरु आहे. होय, ही सिरीज बऱ्याच काळापासून टीज केली जात होती. मात्र, आता स्मार्टफोन ब्रँड Realme ने या स्मार्टफोन सीरीजची लाँच डेट जाहीर केली आहे.
Realme 12 Pro आणि Realme 12 Pro + या लाइनअपमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. चला तर मग बघुयात आगामी स्मार्टफोन सिरीज कधी होणार दाखल?
Realme 12 Pro सिरीज लाँच डेट
Realme ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत या सिरीजच्या लाँचची माहिती दिली आहे. त्यानुसार, Realme 12 Pro सीरीज 29 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता लाँच केली जाणार आहे. या सिरीजचा लाँच इव्हेंट अधिकृत यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येईल.
Realme 12 Pro सिरीज संभाव्य फीचर्स आणि स्पेक्स
अलीकडील काळात पुढे आलेल्या अहवालानुसार, उत्तम कार्यक्षमतेसाठी Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ मध्ये अनुक्रमे Snapdragon 6 Gen 1 आणि Snapdragon 7s Gen 2 चिपसेट असतील. याशिवाय, डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह प्रदान केले जाईल.
एवढेच नाही तर, Realme 12 Pro आणि Realme 12 Pro + मध्ये 8MP Sony IMX355 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP टेलिफोटो सेन्सर असेल. सेल्फीसाठी, बेस मॉडेलमध्ये 16MP कॅमेरा असेल, तर Pro प्रकारात 32MP कॅमेरा असेल. 120x पर्यंत डिजिटल झूम फोनमध्ये आढळू शकते. दोन्ही उपकरणे 5,000mAh जंबो बॅटरीने सुसज्ज असतील. त्यांना 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
Realme 12 Pro सिरीजची संभाव्य किंमत
Realme ने अद्याप Realme 12 Pro सीरीजच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, लीकनुसार फोनची किंमत 20 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. तर, दुसरीकडे Realme 12 Pro+ 25 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. हे फोन अनेक कलर ऑप्शनमध्ये लाँच केले जाऊ शकतात.