पुर्व चंपारण (बिहार) – अयोध्येमध्ये सध्या बांधण्यात येत असलेल्या रामलल्लाच्या मंदिरापेक्षा पाच पट मोठे मंदिर बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात बांधले जात आहे. हे जगातील सर्वात मोठे राम मंदिर ठरणार आहे.
त्याचे नाव विराट रामायण मंदिर आहे. हे मंदिर २०२५ च्या डिसेंबर महिन्यात तयार होईल. या विशाल रामायण मंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंगही बांधले जात आहे. मंदिर उभारणीचे काम सुरू झाले आहे.
मोतिहारी (पूर्व चंपारण) येथील कैथवालिया येथे बांधले जाणारे विराट रामायण मंदिर २०१२ मध्ये सुरू झाले. पाटणाच्या महावीर मंदिराचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भूमिपूजन झाले तेव्हा भाजपचे तत्कालीन आमदार सचिंद्र सिंह उत्साहाने सहभागी झाले होते, पण राजकीय प्रभावामुळे मंदिराचे काम विस्कळीत होऊ लागल्यावर पूर्वेकडील आयपीएस अधिकारी आणि महावीर स्थान ट्रस्ट कमिटीचे सचिव आचार्य किशोर कुणाल राजकारणापासून दूर रहिले.
असे असेल विराट रामायण मंदिर…
एकूण क्षेत्रफळ १२५ एकर
मंदिराचे क्षेत्रफळ ३.६७ लाख चौरस फूट
सर्वोच्च शिखर २७० फूट
चबुतरा उंची १९८ फूट
चार शिखरांची उंची १८० फूट
मंदिराची लांबी १०८० फूट
मंदिराची रुंदी ५४० फूट