• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home महा अपडेट

पुन्हा एकदा सजेल मानवतेचा समागम…

Maha Mumbai by Maha Mumbai
October 29, 2024
in महा अपडेट, महा उत्सव, महा विचारधन
Reading Time: 1 min read
0
पुन्हा एकदा सजेल मानवतेचा समागम…
159
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

पुन्हा एकदा सजेल मानवतेचा समागम
७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीचे सौंदर्य

प्रसाद पारावे : रायगड

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी परिवाराचा 77वा वार्षिक संत समागम 16, 17 व 18 नोव्हेंबर, 2024 ला आयोजित होत आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ असतो. सर्वविदित आहे, की या संत समागमाची भव्यता ही केवळ त्याच्या क्षेत्रफळाने अधोरेखित होत नाही, तर त्याचे इंगित याठिकाणी देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तगणांच्या भावनेमध्ये साठलेले आहे. निरंकारी संत समागम मानवतेचा असा एक दिव्य संगम असतो जिथे धर्म, जात, भाषा, प्रांत तसेच गरीब-श्रीमंत आदि बंधनांच्या पलीकडे जाऊन सकळजन मर्यादेत राहून प्रेम आणि सौहार्दपूर्ण भावाने सेवा, सिमरण आणि सत्संग करतात. हे त्याच संदेशाचे अनुसरण आहे जो समस्त संतांनी, गुरु-पीरांनी वेळोवेळी दिलेला आहे. या तीन दिवसीय संत समागमामध्ये भक्तिच्या अनेक पैलुंवर  गीत, विचार आणि कविता आदि माध्यमातून भक्तगण आपले शुभभाव प्रकट करतील. सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रवचनरुपी अमूल्य उपहाराचादेखील सर्वांना लाभ होणार आहे. यावर्षी सतगुरु माताजींनी समागमाचा विषय दिलेला आहे – ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ (विस्तार, असीम की ओर).

विशाल रूपात आयोजित होणारा निरंकारी संत समागम प्रभावशाली आणि सुरळीतपणे आयोजित करण्यासाठी निरंकारी मिशनचे भक्त व सेवादार देशाच्या कानाकोपऱ्यातून काही महिने अगोदरपासून येऊन आपल्या निष्काम सेवा समर्पित करत समागमाच्या पूर्वतयारी मध्ये आपले योगदान देत राहतात. समागम सेवांचे हे दृश्य स्वयमेव अत्यंत प्रेरणादायी आणि मनोहर असते. यावर्षीही हेच दिसून आले, की सकाळपासूनच सेवांना सुरवात केली जाते ज्यामध्ये सर्व वयोगटातील नर-नारी सहभागी होऊन अनेक प्रकारच्या सेवा करत आहेत. सेवादार भक्तांच्या हातामध्ये मातीची घमेली असतात आणि मुखामध्ये भक्तीभावनेने ओतप्रोत मधुर गीतांचे गायन होत असते. कुठे जमीन समतल केली जात आहे तर कुठे तंबू उभारले जात आहेत. सेवादल वर्दीमध्येही अनेक नौजवान बंधु-भगिनी आपापल्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मैदानावर विविध सेवांमध्ये व्यग्र आहेत.  लंगर, कॅन्टीन, प्रकाशन यांसारख्या अनेक सुविधा व्यवस्थितपणे चालू आहेत ज्यांचे स्वरूप नजिकच्या दिवसांत आणखी विशाल होत जाणार आहे. पहायला गेले तर हा सामाजिक उपक्रम वाटत आहे; परंतु त्याचा आधार पूर्णपणे आध्यात्मिक आहे. सगळे एकमेकांमध्ये परमात्म्याचे रूप पाहून एकमेकांच्या चरणांवर ‘धन निरंकार जी’ असे म्हणून झुकत आहेत. ‘विद्या ददाति विनयम’ या वचनाचे हे जीवंत उदाहरण प्रतीत होत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर एक दैवी चैतन्य विलसत आहे जे त्यांच्या मनातील विश्वास आणि समाधान प्रकट करत आहे. सेवा करणाऱ्या या भक्तांच्या आनंदाची पराकाष्ठा तेव्हा पहायला मिळते जेव्हा सेवा करत असताना त्यांना आपल्या सद्गुरुंचे दर्शन होते. त्या क्षणी भक्तगणांची हृदये आनंदाचे झोके घेऊ लागतात, गाऊ लागतात, नाचू लागतात. याच स्वर्गीय दृश्याची ते वर्षभर प्रतीक्षा करत असतात.

संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समागमाचे समन्वयक श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी सांगितले, की सर्व संतांच्या निवासाची, भोजनाची, स्वच्छता गृहांची, आरोग्याची, सुरक्षेची, आगमन-प्रस्थानाची व इतर सर्व मूलभूत सुविधांची तयारी केली जात आहे. यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य लाभत आहे. समागमाच्या आयोजनाशी संबंधीत सर्व वैधानिक पैलू लक्षात घेऊन सारी व्यवस्था करण्यात येत आहे. थोड्याच दिवसांत हे आध्यात्मिक स्थळ ‘भक्तीच्या नगरी’चे रूप धारण करेल जिथे जगभरातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येऊन सहभागी होतील. मानवतेच्या या महासंगमामध्ये समस्त धर्म-प्रेमी बंधु-भगिनींचे हार्दिक स्वागत आहे.

SendShare64Tweet40Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

रायगड भूषण हेमंत भाऊ पयेर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, तरुणांची प्रेरणा आणि आदर्श व्यक्तिमत्व

October 18, 2024
कुंचल्यातून साकारतोय नव्या युगाचा रंग – दुर्गेश कृष्णा खोत

कुंचल्यातून साकारतोय नव्या युगाचा रंग – दुर्गेश कृष्णा खोत

February 22, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

May 11, 2025
मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

May 11, 2025
राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक

राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेमध्ये पालघर संघाला प्रथम पारितोषिक

May 11, 2025
मानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्पनिरंकारी भक्तांकडून देशभरात ३० हजार युनिट रक्तदान

मानव एकता दिवस – निष्काम सेवेचा अनुपम संकल्पनिरंकारी भक्तांकडून देशभरात ३० हजार युनिट रक्तदान

May 11, 2025

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

May 11, 2025
मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

May 11, 2025
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.