अयोध्येत आज प्रभु श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने देशभरासह राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात सुट्टी असल्याने भल्यापहाटे मुंबईकर घराबाहेर पडले आहेत. मात्र, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त आज देशभरातील शाळा तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भल्यापहाटे नागरिक दर्शनसाठी घराबाहेर पडत आहे. मुंबईकर देखील सिद्धीविनायक तसेच महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. (Latest Marathi News)
पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चर्चेगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच वेळापत्रक कोलमडलं आहे. दरम्यान, जलद गाड्या सध्या स्लो ट्रॅकवरुन वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून सध्या बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे.