भावेश म्हसकर : रायगड
गणेश भक्तांसाठी एक सुखद बातमी आली आहे! सुप्रसिद्ध गायक बुवा, कोकण गंधर्व श्री. संतोष शितकर यांनी त्यांचे नवीन भजन अल्बम “गणराया लवकर येई” हे त्यांच्या युट्युब चॅनेलला रिलीज केले आहे. या अल्बममध्ये एकूण ९ भजन आहेत, जे गणेश भक्तीचा अनुभव घेण्यासाठी विशेष बनले आहेत.
रायगड भूषण बुवा श्री संतोष कानू शितकर यांची गणेशभक्तांमध्ये आणि कोकणासह महाराष्ट्रातील भजन प्रेमींमध्ये एक विशिष्ट ओळख आहे, आणि त्यांच्या भजना मधील गोडवा व भक्तीभाव यामुळे त्यांचे प्रत्येक भजन गणेशोत्सवात विशेष महत्त्वाचे ठरते. नवीन अल्बममध्ये त्यांच्या सुरेल आवाजाने भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे.
“गणराया लवकर येई” या अल्बमचे गीत-संगीत भक्तांना नक्कीच आवडेल आणि गणेशभक्तांच्या मनात विशेष स्थान मिळवेल यात मात्र शंका नाही.
अल्बमची मुख्य वैशिष्ट्ये:
- गायक: बुवा श्री संतोष कानू शितकर
- अल्बमचे नाव: गणराया लवकर येई
- एकूण भजन: ९
- पखवाज – कु. साई गावडे, तबला-कु. सर्वेश पांचाळ / कु. सहदेव सावंत
- सहगायक – श्री गणेश शितकर, श्री निलेश शितकर, बुवा श्री रमेश शितकर, श्री जयेश शितकर
- गायक – कु. भावेश शितकर, बुवा श्री निलेश दळवी, बुवा कु. श्याम कांडे, बुवा कु. जयप्रकाश नाक्ती, बुवा कु. दयानंद मेस्त्री, बुवा श्री सुनील सावंत, बुवा श्री सिद्धेश साळवी.
- थीम: गणेश भक्ती
१) प्रार्थना
२) भजन – गणराज धुंडिराज गणपती
३) रुपावली – सदा माझे डोळा
४) गजर – माझे गणपती बाप्पा आले
५) टाळांचा गजर – मोरया मोरया
६) अभंग- गणराया लवकर येई
७) गौळण – भुलविले वेणुनादे
८) पोवाडा – हिंदू धर्म रक्षणा
९) गजर – जय जय विठ्ठले रखुमाई
हे भजन नुसतेच श्रवणीय नाही तर गणेशोत्सवाच्या आनंदात अधिक रंग भरून भक्तीचा आनंद देणारे आहेत.
कोकण गंधर्व श्री. संतोष शितकर यांच्या पुढील उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा…