जेव्हा आपल्याच मातीतील एखादा तरुण आपल्या कलेच्या जोरावर थेट मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या मंचावर झळकतो, तेव्हा संपूर्ण तालुक्याचा उर अभिमानाने भरून येतो. अशीच एक अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी आपल्या खरसई गावातून समोर आली आहे. खरसई गावचा सुपुत्र आणि आपल्या सर्वांचा लाडका तरुण गायक, तबला वादक सिद्धांत महादेव म्हात्रे आता ठाण्यातील ऐतिहासिक मंचावर आपल्या सुरांचा जादू बिखेरण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘रुहदारी द म्युझिकल प्रोजेक्ट’ प्रस्तुत ‘कबीर x खुस्रो’ (Kabir x Khusrau) या अत्यंत भव्य आणि मानाच्या सांगीतिक मैफलीमध्ये सिद्धांत म्हात्रे हा मुख्य कलाकार म्हणून सादरीकरण करणार आहे. संत कबीर आणि अमीर खुस्रो यांच्या सुफी व भक्ती रचनांचा हा एक नितांत सुंदर प्रवास असणार आहे. सिद्धांतचा हा सांगीतिक प्रवास आज एवढ्या मोठ्या शिखरावर पोहोचलेला पाहून संपूर्ण खरसई गावासह म्हसळा वासियांचे डोळे कौतुकाने ओलावले आहेत.

खरसईच्या सिद्धांत म्हात्रे यांच्या या सांगीतिक प्रवासाचे ‘साक्षीदार’ होऊ या!
आपल्या तालुक्यातील मुलाला एवढ्या मोठ्या मंचावर गाताना पाहणे आणि त्याला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. ठाणे आणि आसपास राहणाऱ्या सर्व म्हसळा वासियांनी या मैफलीला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनम्हसळा लाईव्ह तर्फे करण्यात येत आहे.
दिवस: गुरुवार, १६ जुलै २०२६
वेळ: रात्री ८:३० वाजता
स्थळ: राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
🎟️ तुमची जागा आजच आरक्षित करा:
कार्यक्रमाची तिकिटे TicketKhidki.com वर उपलब्ध आहेत आणि ती वेगाने बुक होत आहेत. आपल्या मातीतील या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी आजच आपली तिकिटे बुक करा!
सिद्धांत महादेव म्हात्रे याने आपल्या कलेने खरसई आणि म्हसळा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठे केले आहे. ‘म्हसळा लाईव्ह’च्या संपूर्ण परिवाराकडून आणि सर्व तालुकावासियांकडून सिद्धांत तुम्हाला या सांगीतिक प्रवासासाठी मनापासून खूप-खूप शुभेच्छा! सिद्धांत, तुझा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे!














