प्रतिनिधी महामुंबई
कधी एखादा प्रवास फक्त पदवीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो आत्मविकास, श्रद्धा आणि साधनेचा अध्यात्मिक आरंभ ठरतो. अशाच दिव्य प्रवासाचा मुकुट आज चढला आहे योग साधक, आंतरराष्ट्रीय वुडबॉल खेळाडू आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व श्री. हेमंत भाऊ पयेर यांच्या शिरावर.
आज ते अधिकृतरीत्या झाले आहेत. “डॉ. हेमंत भाऊ पयेर”, एक असे नाव ज्यात शिस्त, श्रद्धा आणि साधनेचे तेज एकवटलेले आहे.
ज्ञानदीपाचा अखंड प्रवास
योगशास्त्र या सागरात त्यांनी अथक परिश्रमांनी संशोधनाचे मोती शोधले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,शारीरिक शिक्षण विषयाअंतर्गत योग प्रशिक्षणाचा वूडबॉल खेळाडूंच्या कारकक्षमता व कामगिरीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास या विषयावर प्राध्यापक डॉक्टर पी.आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पदवी संपादित केली. या विषयावर सादर केलेले त्यांचे संशोधन हे केवळ शैक्षणिक नव्हे, तर जीवनतत्त्वज्ञानाचे सखोल दर्शन आहे.
या कठीण पण दिव्य प्रवासात त्यांना लाभले प्रा. डॉ. संजय चौधरी सर यांचे प्रेरणादायी नेतृत्व, मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रमोद चौधरी सर यांचे विद्वत्तापूर्ण मार्गदर्शन, आणि ग्रंथपाल श्री. सुनील पाटील सर यांचे सततचे प्रोत्साहन.
या सर्व गुरूंच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या तपश्चर्येच्या बळावर त्यांनी हा खडतर पर्व तेजोमय साधनेत परिवर्तित केला.

योग, खेळ, सेवा आणि अध्यात्म — त्रिवेणी संगम
डॉ. हेमंत पयेर हे फक्त संशोधक किंवा खेळाडू नाहीत ते एक जीवंत साधक आहेत.
आंतरराष्ट्रीय वुडबॉल खेळाडू म्हणून त्यांनी भारताचा तिरंगा उंचावला, तर योगगुरू म्हणून अनेकांना शारीरिक आणि मानसिक संतुलनाचा मार्ग दाखवला.
या साऱ्या कार्यामागे त्यांची अध्यात्मिक प्रेरणा म्हणजेच कन्हेरी मठाची पवित्र भूमी आणि श्री काढसिद्धेश्वर स्वामींचा आशीर्वाद. या पवित्र स्थळाच्या छायेत त्यांनी योगसाधनेचा प्रारंभ केला आणि आज त्या साधनेचे फळ म्हणून ज्ञानाचे ‘डॉ.’ पदवीरूप फुल उमलले आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीत आजही स्वामींच्या कृपेचा सुगंध जाणवतो, आणि कन्हेरी मठाच्या अध्यात्मिक शांततेचा स्पर्श दिसतो.

प्रेरणेचा दीपस्तंभ
‘श्री. हेमंत भाऊ पयेर’ ते ‘डॉ. हेमंत भाऊ पयेर’ हा प्रवास म्हणजे जिद्द, श्रद्धा आणि सेवाभावाचा त्रिवेणी संगम आहे.
अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी सिद्ध केलं. “जेव्हा साधनेत सत्य, सेवेत नम्रता आणि ध्येयात निष्ठा असते, तेव्हा यश हे केवळ परिणाम नसून, ईश्वरी प्रसाद ठरतो.”

अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव
या गौरवशाली क्षणी प्रा. डॉ. संजय चौधरी सर, प्रा. डॉ. प्रमोद चौधरी सर, ग्रंथपाल श्री. सुनील पाटील सर, तसेच सहकारी, विद्यार्थी आणि मित्रपरिवार यांनी डॉ. पयेर यांचे हार्दिक अभिनंदन केले.
त्यांच्या या प्रवासात काढसिद्धेश्वर स्वामींचा कृपाशिर्वाद आणि कन्हेरी मठाची साधना हेच त्यांच्या यशाचे मूळ सूत्र राहिले आहे.
आज ते केवळ “डॉ.” नव्हे, तर योग, अध्यात्म आणि सेवाभाव यांचा जिवंत दीपस्तंभ ठरले आहेत.
