• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home महा अपडेट

प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल

Maha Mumbai by Maha Mumbai
February 25, 2025
in महा अपडेट, महा कोकण, महा विचारधन
Reading Time: 1 min read
0
प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल
157
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

रायगड परिक्षेत्रामध्ये १७ ठिकाणी राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान

पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी. – निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

म्हसळा : प्रसाद पारावे

परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने २३ फेब्रुवारी २०२५ ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले आणि त्याबरोबरच दिल्लीतील निरंकारी मिशनच्या ग्राउंड नं 8 येथे एक विशाल सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्याच्या खरसई झोन मध्ये एकूण १७ ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली ज्यामध्ये सुमारे २ हजारहून अधिक निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. म्हसळा तालुक्यातील खरसई ब्रँच वतीने खरसई नदी परिसरामध्ये हा अभियान राबविण्यात आले.

संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी श्री.जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात राबविलेल्या ‘अमृत प्रोजेक्ट’ परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. युवावर्गाचा विशेष सहभाग हा अभियानाचा मुख्य आधार होता. त्यांनी हेही सूचित केले, की ही मोहीम केवळ एका दिवसापुरती सीमित नाही, तर दरमहा विविध घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर चालू राहील.

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणूकींतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले. पूर्वीप्रमाणेच याही वर्षी ‘चला सावरु, यमुना किनारे’ असा उद्घोष करत या अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात आला.

२७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १ हजार ६५० पेक्षा अधिक ठिकाणी १० लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी एकाच वेळी हे महान अभियान साकारले. हे दृश्य केवळ प्राकृतिक स्वच्छतेपर्यंत सीमित न राहता, अंतर्मनाला निर्मळ आणि पवित्र करण्याऱ्या एका आध्यात्मिक यात्रेचे सुंदर प्रतीक बनले. प्रत्येक श्रद्धाळु भक्ताची समर्पित उपस्थिती या गोष्टीचे प्रमाण होते, की जेव्हा प्रेम, सेवा आणि समरसतेचा दिव्य संगम होतो तेव्हा प्रकृतीही नवजीवनाचा अनुभव घेते.

सतगुरु माताजींनी पाण्याच्या महत्व अधोरेखित करताना समजावले, की पाणी अमृतासमान आहे जे प्रकृतीने आपल्याला सर्वोत्तम उपहाराच्या रुपात प्रदान केले आहे. त्याची स्वच्छता आणि संरक्षण ही केवळ एक जबाबदारीच नव्हे, तर आमची स्वाभाविक सवय बनून गेली पाहिजे. बऱ्याचदा अजाणतेपणे आपण वापरा व फेकून द्या अशा वस्तू व घाण जलस्रोतांमध्ये टाकून प्रदूषणात भर घालत असतो ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. याच चिंतनातून प्रेरित होऊन ‘प्रोजेक्ट अमृत’ सारख्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे जी जल संरक्षण आणि स्वच्छतेच्या प्रति जागरुकता पसरविण्याचा एक महत्वपूर्ण प्रयास आहे.

बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिवसाला समर्पित असलेल्या या पवित्र सेवा अभियानात प्रत्येक भक्ताला जल संरक्षणाच्या दिशेने योगदान देण्याची संधी मिळाली. हा पुढाकार केवळ घाट आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेवर केंद्रीत नसून घरांमध्येही लहान-सहान सवयींतून जल बचतीला प्रोत्साहित करत आहे ज्यायोगे पाण्याचा आदर व्हावा आणि हे अमूल्य संसाधन भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहू शकेल.

पर्यावरण सुरक्षेंअंतर्गत जल संरक्षणामध्ये आपली सकारात्मक सक्रिय भूमिका निभावत ग्लोबल एनर्जी ॲन्ड एन्व्हायरनमेंट फाउंडेशन (GEEF) ने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला (SNCF) प्रतिष्ठित ‘वाटर कंजर्वेशन इनिशिएटिव एनजीओ ऑफ द ईयर 2025’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा गौरवपूर्ण सन्मान SNCFच्या प्रोजेक्ट अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन आणि त्यातील विविध जल संरक्षण व स्वच्छतेसाठी घेतलेल्या पुढाकाराच्या प्रति अथक समर्पणाचे प्रतीक आहे. नि:संशय जल संसाधनांची शुद्धता आणि सतत संरक्षण करण्यामध्ये SNCF द्वारे केले जाणारे प्रयास समाजाला स्वच्छ, स्वस्थ आणि समृद्ध भविष्याकडे अग्रेसर होण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

Tags: sant nirankari missionSNMswach jal
SendShare63Tweet39Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Maha Mumbai

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

नव्या युगाच्या सूरात गुंजली स्वराज्याच्या शंभूची गाथा!

May 11, 2025
मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

मातृदिनानिमित्त सिद्धांत महादेव म्हात्रे यांचं ‘आई’ हे हृदयस्पर्शी गीत रसिकांच्या भेटीला

May 11, 2025
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.