मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशीराने धावत आहेत. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांचे हाल झाले आहेत. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल तब्बल 10 ते 15 मिनिटांनी धावत आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे.
आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईची लाईफलाईन म्हणज लोकल ट्रेन कोलमडली आहे. तांत्रिक बिघाडामुळे कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहेत. तसेच लोकल उशीराने आल्याने कामाच्या ठिकाणी पोहचण्यास मुंबईकरांना विलंब होणार आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान लोकल पकडण्यासाठी गर्दीमुळे मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तर दुसरीकडे आज पश्चिम रेल्वेवर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या वेगमर्यादेचा त्रास सहन करावा लागणार आहे. चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर ही वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. तर कांदीवली ते गोरेगाव दरम्यान ६व्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान मुंबईच्या दोन्ही मार्गावर काम सुरू असल्याने मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावं लागणार आहे.