पनवेल(अरुण पाटकर)-
पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स,असोसिएशन रायगड ची बेंचप्रेस क्लासिक आणि इक्विप)या स्पर्धा (पुरुष आणि महिला गट) सब ज्युनिअर ज्युनिअर, सीनियर,मास्टर्स अशी सर्व गटांची स्पर्धा रविवार दिनांक ०१सप्टेंबर २०२४ रोजी रॉयल गार्डन,मुद्रे,कर्जत येथे पार पडली. सदर स्पर्धा ही मा. श्री सुधाकर परशुराम घारे .(माजी उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण आरोग्य व क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद,) यांच्या सौजन्याने कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने आयोजित केली होती.सदर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून श्री सुधाकर घारे साहेब आणि विशेष अतिथी म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव श्री संजय सरदेसाई, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी(ठाणे) हे उपस्थित होते. तसेच कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी हजर होते. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोगल, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर आणि सचिव अरुण पाटकर हे सुद्धा मान्यवर हजर होते. या स्पर्धेच्या क्लासिक सब ज्युनिअर मुलींच्या गटात नंदिनी उपर .(बॉडी लाईन जिम खोपोली),जूनियर मुलींच्या गटात अमृता भगत (पॉवर हाऊस क्लब ,खोपोली)हे “किताब विजेते झाले सब ज्युनिअर क्लासिक मुलांच्या गटात श्रेयश जाधव (आयर्न मॅट जिम, खोपोली), जूनियर मुलांच्या गटात तन्मय पाटील(संसार जिम पेण), सीनियर क्लासिक पुरुष गटात गणेश तोटे(फिट ऑन जिम पनवेल) आणि मास्टर्स(४९,५०,६०, आणि ७० वर्षावरील स्पर्धक) स्पर्धेत दिनेश पवार (स्पार्टन जिम, लौजी खोपोली) हे किताब विजेते झाले. सांघिक विजेतेपद प्रथम क्रमांक चे मानकरी जी व्हीआर जिम कर्जत झाले. “द्वितीय क्रमांक हनुमान व्यायाम शाळा पेण तर तृतीय क्रमांक बॉडी लाईन जिम खोपोलीयांना मिळाला. .स्पर्धेसाठी मुंबईचेगोपीनाथ पवार, सुरेश धुळप, जितेंद्र यादव, अंकुश सावंत, प्रशांत सरदेसाई, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त साहिल उतेकर हे पंच हजर होते. तसेच राष्ट्रीय पंच विजय पाटील (पुणे), राकेश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विक्रम अधिकारी, मयूर होडगे(नवी मुंबई), आंतरराष्ट्रीय खेळाडू सलोनी मोरे (रेल्वे), तृप्ती सावंत, केतन गायकवाड आणि नवनाथ दाभाडे हे उपस्थित होते.