• About Us
  • contact us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
Maha Mumbai
Advertisement
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
No Result
View All Result
Maha Mumbai
No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन
Home नवी मुंबई

७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना

Maha Mumbai by Maha Mumbai
September 21, 2026
in नवी मुंबई, महा अपडेट, महा विचारधन
Reading Time: 1 min read
0
७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना
155
SHARES
1.6k
VIEWS
जाहिरात Popup Image

Advertising...!

प्रत्येक हृदयातून सेवेचा आणि मानवतेचा शुभारंभ व्हावा — निरंकारी राजपिता रमितजी

समालखा, २० सप्टेंबर २०२६ :विविधतेने नटलेल्या या जगात आपली रूपे, भाषा आणि जीवनशैली वेगवेगळी असली, तरी या बाह्य भिन्नतेच्या पलीकडे असलेली चेतना एकच आहे. आपण सर्वजण या परमात्म्याचीच लेकरे आहोत. सत्गुरूंनी आपणा सर्वांना प्रेमाच्या अदृश्य धाग्याने जोडून मानवतेच्या एकतेचा संदेश दिला आहे. संत निरंकारी मिशन हीच भावना ‘वसुधैव कुटुंबकम्’—‘संपूर्ण विश्व एक परिवार’ या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात साकारत आहे. येथे प्रेम हा केवळ विचार नसून, तो जीवन जगण्याची कला रुपात प्रत्ययास येत आहे.

७९वा वार्षिक निरंकारी संत समागम, परम आदरणीय सत्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हरियाणातील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात येणार आहे. आत्मिक जागृती आणि मानवतेच्या एकतेचा संदेश हृदयात घेऊन देश-विदेशातून लाखो श्रद्धाळू भक्त या समागमात सहभागी होणार आहेत. सत्गुरूंचे दिव्य दर्शन आणि पावन प्रवचन यांच्या माध्यमातून श्रद्धाळूंना आत्मिक शांतीचा अनुभव घेताना जीवनात प्रेम, सेवा, करुणा आणि मानवतेची भावना अंगीकारण्याची प्रेरणा मिळणार आहे.

समागमाच्या सेवांचा शुभारंभ आज श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाने भारलेल्या वातावरणात झाला. निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन हस्ते सेवा स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मिशनच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य, केंद्रीय सेवादलाचे अधिकारी तसेच हजारो श्रद्धाळू भक्तांनी प्रेम आणि निष्ठेने सेवेत सहभाग घेतला. संत निरंकारी मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय राजकुमारी ‘मामीजी’ आणि संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजा यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून निरंकारी राजपिताजींचे हार्दिक स्वागत केले. हा पावन प्रसंग सेवा ही साधना मानून, समर्पणाला जीवनाचा आधार बनविण्याची प्रेरणा देणारा ठरला.

७९व्या संत समागमाच्या सेवांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित श्रद्धाळूंना संबोधित करताना निरंकारी राजपिताजींनी सत्गुरू माताजींचे प्रेम आणि आशीर्वाद संतांपर्यंत पोहोचवत सांगितले की, संत समागमाच्या सेवांचे हे विशाल स्वरूप असंख्य संतांच्या निःस्वार्थ सेवा, त्याग आणि समर्पणाचे फलित आहे. यातूनच आपल्या जीवनातही सेवा आणि परोपकाराची भावना जागृत करण्याची प्रेरणा मिळते. मानवजन्म केवळ स्वतःसाठी नव्हे, तर इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी मिळाला आहे. सेवेतून ‘मी’ची भावना संपून ‘आपण’ची भावना निर्माण होते, तेव्हाच सेवेचा खरा अर्थ प्रकट होतो. सत्गुरूंचे ज्ञान हीच ती जागृती आहे, जी आपली दृष्टी बदलून प्रत्येक मानवामध्ये निरंकाराचे स्वरूप पाहण्याची प्रेरणा देते. जेव्हा मानव मानवावर प्रेम करेल आणि त्याचा सन्मान करेल, तेव्हा ही धरती अधिक सुंदर बनेल. सत्गुरूंच्या चरणी हीच प्रार्थना आहे की, आपण केवळ मानव म्हणून नव्हे, तर आपल्या कर्मातून आणि वर्तनातूनही खऱ्या अर्थाने मानव बनू शकू.

यंदाच्या संत समागमाची ‘जागृती’ ही संकल्पना असून, ती मनुष्याला बाह्य जगापासून अंतर्मुख होऊन स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची आणि आपल्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून घेण्याची प्रेरणा देते. सत्गुरू माताजींनीही सांगितले आहे की, जागरूक आणि सजगतेने, भक्त प्रत्येक क्षणी भक्तीमध्ये तल्लीन राहतात. ‘जागृती’ म्हणजे एखाद्या नव्या गोष्टीची अचानक जाणीव होणे नव्हे, तर प्रत्येक क्षणी स्वतःच्या अंतरंगात सजग आणि सचेत राहणे होय. संसारात राहूनही त्याच्या प्रभावापासून स्वतःला अलिप्त ठेवणे आणि प्रत्येक परिस्थितीत प्रभुस्मरणाशी जोडलेले राहणे, हीच खरी ‘जागृती’ आहे.

निःसंशय, निरंकारी संत समागम कोणत्याही धर्म, जात, भाषा किंवा प्रदेशापुरता मर्यादित नसून, मानवता आणि सत्याचा प्रकाश पुढे नेणाऱ्या प्रत्येक हृदयाचा संगम आहे. येथे सेवेद्वारे मानवता आणि अध्यात्म यांचा दिव्य मिलाप घडतो. हजारो हात सेवेसाठी एकत्र येतात, तर लाखो हृदये प्रेमाच्या बंधनात जोडली जातात. विविधतेतही एकत्वाचा संदेश प्रत्यक्ष साकार झालेला या समागमाच्या माध्यमातून अनुभवास येतो.

Tags: samalakhasant nirankari missionsant nirankari samagamSNM
SendShare62Tweet39Share
Maha Mumbai

Maha Mumbai

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, हा अख्खा पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

September 30, 2024
अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अहमदाबाद विमान अपघातात मोठी दुर्घटना; खासदार सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

June 12, 2025
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महाघोटाळा; ऑपरेटरने फेरफार करुन हडपले लाखो रुपये

September 30, 2024
शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

शेतीत परंपरेला टिकवत नवोन्मेषाची जोड; म्हसळ्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले

June 13, 2025

निष्काम निस्वार्थी सेवेचे प्रतीक निरंकारी भक्त

0
शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न : जगभरातून दररोज सुमारे 10 लाख भाविक उपस्थितशांती

0
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येणार? ; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान…!

0

अखेर नवी मुंबईकरांचा मेट्रो प्रवास सुरू…!

0
७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना

७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना

September 21, 2026
अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

August 20, 2026
योगासनांचा महाकुंभ! कामोठ्यात १५ ऑगस्टला रंगणार ‘रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’

योगासनांचा महाकुंभ! कामोठ्यात १५ ऑगस्टला रंगणार ‘रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७’

August 14, 2026
रायगड हिरा चमकणार ऐतिहासिक मंचावर! सुप्रसिद्ध ‘रुहदारी’ प्रोजेक्टमध्ये खरसईच्या सिद्धांत महादेव म्हात्रे यांना मानाचे स्थान

रायगड हिरा चमकणार ऐतिहासिक मंचावर! सुप्रसिद्ध ‘रुहदारी’ प्रोजेक्टमध्ये खरसईच्या सिद्धांत महादेव म्हात्रे यांना मानाचे स्थान

July 16, 2026

Recent News

"Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #NewsPortal "Your go-to destination for comprehensive, real-time news coverage. From global headlines to local stories, we deliver unbiased reporting, insightful analysis, and diverse perspectives. Stay informed, stay connected. #MahaMumbai

Follow Us

Browse by Category

  • News
  • नवी मुंबई
  • महा अपडेट
  • महा उत्सव
  • महा कोकण
  • महा क्राईम
  • महा टेक
  • महा टेंडर
  • महा मनोरंजन
  • महा मुंबई
  • महा योजना
  • महा राजकारण
  • महा रोजगार
  • महा विचारधन
  • महा स्पोर्ट्स

Recent News

७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना

७९व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना

September 21, 2026
अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा संदेश देणाऱ्या ‘मुक्ती पर्वा’चे वडवली येथे भव्य आयोजन!

August 20, 2026
  • Home 1

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.

No Result
View All Result
  • महा अपडेट
  • महा स्पोर्ट्स
  • महा राजकारण
  • महा मनोरंजन
  • महा क्राईम
  • महा टेंडर
  • महा उत्सव
  • महा विचारधन

© 2023 Maha Mumbai - Meta Bay Meta Bay.