लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्य पुरस्कार २०२५
प्रकाश जनार्दन म्हात्रे जी यांचा शिक्षण व सामाजिक सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
रायगड जिल्ह्यातील खरसई येथील आदर्श शिक्षक आणि मुख्याध्यापक आदरणीय प्रकाश जनार्दन म्हात्रे जी यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्य पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.

प्रकाश म्हात्रे जी हे रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा तोंडसुरे, ता. म्हसळा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत.
संत निरंकारी मिशनमधील योगदान :
प्रकाश म्हात्रे जी हे सध्या संत निरंकारी मिशन, खरसई (रायगड झोन) येथे झोनल इंचार्ज म्हणून सेवा बजावत आहेत. सामाजिक समरसता, आध्यात्मिक जागृती आणि मानवतावादी मूल्यांचा प्रसार हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यांनी निरंतर सेवा आणि समर्पणातून अनेकांना प्रेरणा दिली आहे.

📌 पुरस्कार वितरण सोहळा
📅 दिनांक – रविवार, २९ जून २०२५
🕥 वेळ – सकाळी १०.३० वाजता
📍 स्थळ – शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर