प्रसाद पारावे : रायगड
गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर, 2025 रोजी श्रीनगर येथील इंटरनॅशनल हॉटेल मध्ये गांधी ग्लोबल फॅमिलीच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची अध्यक्षता पद्मश्री डॉ. एस. पी. वर्मा यांनी केली. या कार्यक्रमाचा उद्देश महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करणे तसेच त्यांच्या सिद्धांत व विचारांना पुनः स्मरण करणे हा होता. या गौरवशाली कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित संस्थांनी देखील सहभाग घेतला, ज्यामध्ये संत निरंकारी मिशनचे प्रतिनिधित्व करत संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री. जोगिंदर सुखीजाजी यांची उपस्थिती सन्माननीय होती.
श्री. सुखीजाजी यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या संबोधनात संत निरंकारी मिशनचा मूलभूत सिद्धांत “मानवाला मानव प्रिय असावा, एकमेकांचा आधार बनावा” अधोरेखित केला. निरंकारी मिशन कशा प्रकारे विश्वबंधुत्व, एकत्व आणि बंधुभावाच्या भावनेचा प्रभावी प्रसार करीत आहे हे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांनी सर्व मान्यवर व्यक्तींना व संस्थांना आगामी निरंकारी संत समागम जो 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, 2025 पर्यंत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे होणार आहे त्यासाठी आमंत्रित केले. ते पुढे म्हणाले, की “संत समागम हा असा आध्यात्मिक मंच आहे, जिथे सर्व धर्म, जात व समाजातील लोक एकत्र येऊन प्रेम, एकता आणि बंधुभावाचे अनुपम उदाहरण प्रत्यक्ष साकार करतात. हे आयोजन मानवतेच्या खऱ्या स्वरूपाला प्रकाशित करते.”
आपत्ती निवारण आणि समाज सेवेतील अग्रेसर भूमिकेसाठी विशेष सन्मान
मानवतेच्या निःस्वार्थ सेवेच्या मार्गावर अग्रेसर संत निरंकारी मिशन, सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली निरंतर समाजकल्याणाचे कार्य समर्पण भावनेने करत आहे. मिशनद्वारे केली जाणारी ही सेवा “संपूर्ण विश्व एक कुटुंब” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा सशक्त व यशस्वी प्रयास आहे.
मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम तसेच शिबिरे आयोजित केली जातात. ज्यात पर्यावरण संरक्षण, आरोग्य सेवा, रक्तदान, स्वच्छता अभियान तसेच आपत्ती निवारण अशा क्षेत्रांत संपूर्ण भारतभर मिशन निरंतर कार्य करत आहे जे उल्लेखनीय व अनुकरणीय आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत जसे की पूर, ढगफुटी आणि ऑपरेशन सिंदूरच्या काळात मिशनने अत्यंत संवेदनशीलता व तत्परतेने मदतकार्य केले. प्रभावित कुटुंबांपर्यंत अन्नधान्य, औषधे व आवश्यक मदत पोहोचवून मिशनने पुन्हा एकदा सिद्ध केले, की ते मानव सेवेच्या प्रत्येक कार्यासाठी सदैव तत्पर व सक्रिय आहेत. या सेवांची भरपूर प्रशंसा वेळोवेळी समाजातील विविध घटकांसह शासनानेही केली.
याच क्रमात, शेर-ए-कश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र, श्रीनगर येथे आयोजित भव्य समारंभात जम्मू व कश्मीरचे माननीय उपराज्यपाल श्री. मनोज सिन्हाजी यांनी संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री. जोगिंदर सुखीजाजी यांना मिशनच्या या निःस्वार्थ सेवेबद्दल विशेष सन्मान प्रदान केला. सन्मान स्वीकारताना श्री. जोगिंदर सुखीजाजी म्हणाले, की “संत निरंकारी मिशन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने सदैव समाजकल्याण आणि मानव सेवेप्रति कटिबद्ध आहे. आमचे प्रत्येक कार्य सेवा, समर्पण आणि एकत्व या सिद्धांतांवर आधारित आहे. नैसर्गिक आपत्तीमधील मदतकार्य असो वा रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमांतील सहभाग असो, या सगळ्यात मिशन नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आमचा उद्देश “प्रत्येक मानवापर्यंत प्रेम, शांती आणि ऐकतेचा संदेश पोहोचवणे” हा आहे.
निःसंशयपणे, गांधी जयंतीच्या या स्मरणीय प्रसंगी संत निरंकारी मिशनचा सहभाग व मिशनला मिळालेला सन्मान हे दोन्हीसुद्धा समाजाप्रतीच्या मिशनच्या समर्पण, निःस्वार्थ सेवा आणि विश्वबंधुत्वाच्या भावनेचे उज्ज्वल प्रतीक आहे. हे मिशन आजही त्याच आदर्श मार्गावर वाटचाल करत आहे, जिथे मानवता सर्वोतोपरी आहे.