Mumbai Metro Job:
मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करायची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.मुंबई मेट्रोल रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने भरती जाहीर केली आहे. मुंबई मेट्रोत डेप्युटी मॅनेजर आणि ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
मुंबई मेट्रोतील या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी mmrcl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शवेटची तारीख १२ ऑक्टोबर २०२४ आहे. मुदतीपूर्वी उमेदवारांनी अर्ज करावेत. (Metro Job)
मुंबई मेट्रोत डेप्युटी मॅनेजरसाठी २ जागा रिक्त आहेत.तर असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी ५ जागा रिक्त आहेत.असिस्टंट मॅनेजरसाठ २ जागा आहेत. डेप्युटी इंजिनियर पदासाठी १ रिक्त जागा आहे. ज्युनिअर इंजिनियरसाठी १ रिक्त जागा आहे. मुंबई मेट्रोत एकूण ११ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी इंजिनियर, ज्युनिअर इंजिनियरसाठी वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. याबाबत सर्व माहिती उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Mumbai Metro Job)
डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांना ८० हजार ते २,२०,००० रुपये पगार देण्यात आला आहे.असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांना ७० हजार ते २,००,००० रुपये पगार देण्यात येणार आहे.असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी इंजिनियर पदासाठी ५० हजार ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ३५,२८० ते ६७,९२० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल.याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.