महामुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र रायफल असोसिएशन, वरळी येथे ६ ते ९ जून २०२५ या कालावधीत पार पडलेल्या २८व्या कॅप्टन एस. जे. इझेकैल (एनआर) शूटिंग स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील सिद्धांत रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लब मधील ३१ नेमबाजांनी भाग घेत आपल्या कौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधले.
या स्पर्धेतील यशस्वी नेमबाजांची ७ जुलै रोजी देहरादून, उत्तराखंड येथे होणाऱ्या ‘इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप’साठी निवड झाली आहे, ही रायगडवासीयांसाठी गौरवाची बाब आहे.
स्पर्धेतील विशेष यश:
कुणाल पाटील (जासई, उरण) – ५० मिटर रायफल प्रोन (जुनिअर मेन) – रौप्य पदक
गौरव ठाकूर (चिरनेर, उरण) – ५० मिटर रायफल प्रोन (पुरुष) – कांस्य पदक
वेदांत खारके (नेरे, पनवेल) – २५ मिटर स्टँडर्ड, MAFS पिस्टल, ५० मिटर फ्री पिस्टल – उत्कृष्ट कामगिरी
वैभवी बिष्ट – ५० मिटर रायफल जु. वूमन – रौप्य पदक
करण बेहेर – ५० मिटर ओपन साईट रायफल – रौप्य पदक
मयुरेश सावंत – कांस्य पदक
अवनी कोळी (दिघोडे, उरण) – शॉटगन ट्रॅप – रौप्य पदक
कार्तिकी आणि स्वरा देऊळेकर, दिग्विजय चौगुले, राजू मुंबईकर, शुभम पुसलकर, दुर्गा जाधव, नंदकुमार माने, सागर वैगनकर, वरा देऊळेकर – विविध गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी
या खेळाडूंना महाराष्ट्र रायफल संघटनेचे सचिव शिला कानूगो आणि अध्यक्ष अशोक पंडित यांच्याकडून पदक देवून गौरवण्यात आले.
शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव
क्लबचे सचिव आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू किसन खारके, प्रशिक्षक अलंकार कोळी व राल्स्टन कोयलो यांच्यासह अजिंक्य चौधरी, समाधान घोपरकर, अविनाश भगत, प्रकाश दिसले, सुनील मढवी, समीर अंबवणे, नंदकुमार मुंबईकर आणि मित्रमंडळींनी सर्व नेमबाजांचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.