मुंबई उपनगरातील निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हय़ातील 26 विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक दिवशीच्या कर्तव्याकरिता नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणास काही कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिले आहेत. सदर गैरहजर कर्मचाऱ्यांविरुद्ध लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.